२१८ कोटी पेक्षा जास्त किंमतीचे एम. डी. (Mephedrone) अंमली पदार्थ गोडावुन मधुन जप्त केले ....

  रायगड पोलीसांची धडक कारवाई


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील :

खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याच्या माहीतीवरुन खोपोली पोलीसांनी छापा मारुन  कारवाई केली.

कारवाईनुसार खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ३६४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (C), २२ (C) सह कलम २९ प्रमाणे दि. ०८/१२/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कारवाईच्या वेळी पोलीसांनी १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ तसेच त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल इ. साहीत्य जप्त केले होते. सदर गुन्ह्यात ३ आरोपींना अटक केलेले असुन त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, खालापुर यांनी दि. १४/१२/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपी अॅन्थोनी पाऊलोस करीकुट्टीकरण याने खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे होनाड गाव, ता. खालापुर येथे एका गोडावुन मध्ये लपवुन ठेवलेला एकुण ७ बरेलमधील एकुण १७४.५ किलो वजनाचा रु. २१८ कोटी १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) अंमली पदार्थ दि. १०/१२/२०२३ रोजी जप्त केलेले आहेत. तसेच गुन्ह्यातील अटक आरोपींनी काही अंमली पदार्थ हे परदेशात पाठवलेले असल्याची माहीती प्राप्त झाली असुन त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.

सदर कारवाई मा.श्री. प्रविण पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परीक्षेत्र, मा.श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, रायगड, मा. श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधिक्षक, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर यांचे नेतृत्वाखाली गुन्ह्याचे अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत, सहा. पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उप निरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, पोहवा /२१३० सागर शेवते, पोहवा /१०८६ प्रसाद पाटील, पोहवा/७८६ प्रशांत पाटील, पोहवा /११३५ प्रदीप कुंभार, पोहवा /१०७२ संतोष रुपनवर, पोना/२३६७ लिंबाजी शेंडगे, पोना/२२७४ सतीष बांगर, पोना/२२७८ प्रवीण भालेराव, पोशि/१८४९ प्रदीप खरात यांनी केलेली आहे.

जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड

Post a Comment

Previous Post Next Post