प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-कोल्हापुर शहरात आणि उपनगरात मोबाईल हरविल्यांच्या तक्रारीत वाढ़ होऊन त्या-त्या हद्दीतील पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच प्रमाणे करवीर पोलिस ठाण्यातही तक्रारी दाखल आहेत सदर गहाळ झालेल्या मोबाईलचा IMEI NO.आणि सायबर पोलिसांच्या मदतीने मोबाईल कंपनीशी संपर्क साधून शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी दिले होते.
सदर करवीर पोलिस आणि सायबर पोलिसांनी मिळून पोलिसांची पथके तयार करून महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात पाठवून शोध घेतला असता 35 मोबाईसंच अंदाजे 3लाख 50 हजारांचा मुद्देमाल मिळून आला .तसेच करवीर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी कडुन 150 ग्राम.वजनाचे सोन्याची लगड याची अंदाजे 9 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल या गुन्हयातील मुळमालकांना परत करण्यात आला.हरविलेले मोबाईल धारकांची कागदपत्रं तपासुन परत दिल्याने नागरिकांनी पोलिस पथकाचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी त्यांच्या चेहर्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते.ही कारवाई पोलिस अधीक्षक मा .महेंद्र पंडीत आणि ,अप्पर पोलिस उपअधीक्षक जयश्री देसाई,याच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तसेच करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथक या दोघांनी मिळून केली.