मेकर गृपच्या तिघांना अटक करून त्यांना तीन दिवसांची कोठडी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या मेकर गृप ऑफ इंडिया कंपनीच्या संचालकांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात डिंसेबर 2018 मध्ये  गुन्हा दाखल आहे.या प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने तिघां जणाना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नारायाण पांडुरंग खरजे(रा.मुंबई)गौतम हरिदास माने (लातूर )आणि माधव निवृत्ती गायकवाड (रा.पुणे). अशी या तिघांची नावे आहेत.या कंपनीने 2010 ते 2018 या काळात गुंतवणूकदारांच्या कडून कोट्यावंधी रुपयांची गुंतवणूक करून घेऊन काही काळ परतावा देऊन त्या नंतर देणे बंद केले.त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची लक्ष्यात येताच गुंतवणूकदारांनी डिसे.18 साली शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post