प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- उद्यमनगर परिसरात असलेल्या स्विट दुकानदारांकडे दोघां फाळकूट दादांनी मोफत मिठाई मागत काउंटरवरची काच फोडुन दुकानच्या मालकांस बेदम मारहाण केल्या प्रकरणी प्रथमेश शिंगे आणि दिलीप पाटील या दोघांच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी त्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.अधिक माहिती अशी की. शिवकुमार बघेल यांचे या परिसरात स्विट मार्ट नावाचे दुकान असून या दोघांनी दुकानात येऊन मोफत मिठाईची मागणी करुन काउंटरवरची काच फोडुन त्यांना जबर मारहाण केली होती.काचेवर हात मारताना या दोघांपैकी एकाच्या हाताला काच लागून रक्त वहात होते.ते पाहून त्या दुकान मालकास चक्कर येऊन खाली कोसळून बेशुध्द झाले असता त्यांना त्याची पत्नी निर्मला शिवकुमार बघेल यांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तसेच हाताला काच लागलेला संशयीत तो ही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाला होता.या घटनेची सीपीआर पोलिस चौकीत झाली होती ..दरम्यान या दोघांच्या विरोधात निर्मला शिवकुमार बघेल यांनी राजाराम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.राजाराम पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याना अटक करण्यात आली.आज त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पुढ़ील तपास राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिस तपास करीत आहेत.