प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापुर जिल्हयातील विवीध पोलिस ठाण्यात नागरिकांच्या कडून मोबाईल हरविल्याच्या तक्रारी दाखल होत्या.सायबर पोलिसांनी हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन आज पोलिस विशेष महानिरीक्षक मा.सुनिल फुल्लारीसो यांच्या हस्ते ज्यांचा त्यांना मोबाईल परत देण्यात आला.या वेळी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापुर जिल्हयात विविध पोलिस ठाण्यात मोबाईल हरविल्याच्या तक्रारी नागरिकांनी दाखल केल्या आहेत.सदर दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सायबर पोलिसांनी एकत्रितपणे तपास करून IMEI एकत्र करून सायबर पोलिसांच्या मार्फत संबंधित मोबाईल कंपनीशी संपर्क साधून आणि CFIR पोर्टलचा वापर करून पोलिस अधीक्षक मा.महेद्र्ं पंडीत यांनी शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांनी वेगवेगळी पथके तयार करून शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या या पथकाने तपास करुन 30 लाख रुपये किमंतीचे 250 मोबाईलचा शोध घेऊन ज्यांचे त्यांना मोबाईल परत देण्यात आला.
ज्या नागरिकांचे मोबाईल हरविले होते त्यानी आपल्याला मोबाईल परत मिळणार नाही म्हणुन निराश झाले होते.पण पोलिसांनी मात्र आशेचा किरण दाखवून ज्या नागरिकांचे मोबाईल हरविले होते त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून मा.विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.सुनिल फ़ुल्लारीसो यांच्या हस्ते देण्यात आले .या वेळी नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्याने पोलिसांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.सदर कामी सायबर पोलिस पथकाचे विशेष पोलिस मा.फुल्लारीसो यांनी अभिनंदन केले. .