प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-लक्ष्मीपुरी धान्य बाजार पेठेत असलेल्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका धान्य दुकानात छताचे पत्रे तोडून आत प्रवेश करून दोन लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.ही चोरी करण्या अगोदर चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्या होत्या.त्यामुळे ही चोरी माहितगार व्यक्तीने केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे धान्य दुकान महादेव चिवटे आणि निळकंठ सावर्डेकर यांच्या मालकीचे असून चोरट्यांनी दुकानातील असलेली तिजोरी उघडता आली नसल्याने ड्रॉवर मध्ये असलेले पंचवीस हजार आणि सावर्डेकर यांच्या दुकानातील पावने दोन लाख रुपये लांबविल्याची घटना घडली आहे.शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार लक्ष्यात आला.त्या नंतर व्यापारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात माहिती दिली.पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पहाणी करून पंचनामा करून श्वान पथकास पाचारण केले मात्र श्वान तेथेच घुटमळले .याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.