प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-राजारामपुरी येथे एका कुंटुबांत घरकाम करणारी महिलेने तिजोरीतील अडीच लाख रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात घरकाम करणारी निकीता सचिन जाधव (वय 26 .नववी गल्ली ,राजारामपुरी).हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजारामपुरी येथे शिंदे कुंटुबिय रहात असून त्यांनी घरकामासाठी निकीता जाधव या महिलेस ठेवले होते.मात्र निकीताने त्यांचा विश्वासघात करून 25 सप्टे.ते 16 डिंसे.23 या दरम्यान निकीताने शिंदे यांच्या घरातलं पाच तोळ्याचे गंठण आणि इतर दागिने असा अडीच लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला .निकीताने आपल्या घरी चोरी केलयाचे समजताच शिंदे यांनी 21डिंसे.रोजी निकीता विरुध्द राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.सदर महिलेस या प्रकरणी ताब्यात घेऊन तिच्या कडे चौकशी केली असता प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली
पोलिसांनी तिच्या ताब्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करुन निकीता जाधव हिला अटक केली राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ.शेख पुढ़ील तपास करीत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,मा.अजित टिक्के ,राजाराम पुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती दिपीका जौजाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने कारवाई करून गुन्हा उघडकीस आणला .