प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे शेतीचा बांध तोडल्याच्या वादातुन राजाराम श्रीपती राऊत (रा.कुडीत्रे).याने सर्जेराव श्रीपती राऊत (कुडित्रे) याच्यावर खुरप्यांने वार करून जखमी केले.ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून या प्रकरणी संशयीत राजाराम राऊत यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कुडित्रे येथे गुरुवारी सकाळी शेत नांगरणीचे काम चालू होते.त्या वेळी सामाईक असलेला बांध तोडल्यामुळे या दोघांच्यात वाद झाला.या वादात राजाराम याने सर्जेराव याला शिवीगाळ करुन मारहाण करून खुरप्याने वार करून जखमी केले.या वेळी तेथील लोकांनी वाद मिटवून जखमी सर्जेराव याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सर्जेराव याची पत्नी बबीता राऊत यांनी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या गुन्हयाचा तपास करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार धनवडे अधिक तपास करीत आहेत.