प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेकायदेशीर पार्टीचे आयोजन करणाऱ्या वर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला उजळाईवाडी येथे असलेल्या शाहु टोल नाका परिसरात असलेल्या क्यफे माया येथे मद्यधुद दारु पिऊन डीजे च्या तालावर धिगांणा चालू असल्याचे समजले वरून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून या कॅफेचे मालक दयानंद जयंत साळोखे (रा.उजळाईवाडी). या पार्टीचे आयोजिका मयुरा राजकुमार चटानी (रा.नागाळापार्क).या पार्टीत सहभागी असलेले 60 ते 65पुरुष आणि 40 ते 45 महिला आढ़ळुन आल्या .या पार्टीत डीजेचा ऑपरेटर नागेश खरात.आणि मालक दिगंबर सुतार (दोघे रा.फुलेवाडी)कामगार गजेंद्र रामदास शेठ (रा.बेकर गल्ली) आणि गौरव शेवडे (रा.न्यु.शाहुपुरी).या सर्वावर गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच 53 हजार 785किमंतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या ,रोख रक्कम 88 हजार 740 रुपये.आणि 1लाख 40 हजार किमंतीचा डिजे सिस्टीम असा एकूण 2 लाख 85हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळसकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.या पुढ़ेही बेकायदेशीर पार्ट्या करण्यारयां वर धडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले.