प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
नेरळ धामोते येथे तरुणीच्या विनयभंगाचा प्रकार घडला आहे. याबाबत तरुणीने घरच्यांना याबाबत सांगताच घरच्यांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठत आरोपी तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ वा.सुमारास पिडीत तरुणी हि कॉलेज वरुन तिच्या घरी धामोते येथे जात होती. त्यावेळी डिस्कवर हॉटेल येथे रिक्षातुन उतरुन पायी चालत जात असताना आरोपी भूषण उर्फ नित्या संजय म्हसकर हा तेथे त्याचे मोटार सायकलवर येवुन पीडित तरुणीचा पाठलाग करत पुढे गेला. त्यानंतर आरोपी त्याचे घराचे पाठीमागे जात पीडित तरुणी हि तिथून जात असताना स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले. या प्रकाराने घाबरल्या मुळे तरुणी घरी भेदरलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने झाला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून घरच्यांना देखील राग आला. त्यामुळे त्यांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठत याबाबत फिर्याद दाखल केली.
. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं ३२२/२०२३ भा.दं.वि.क. ३५४ (ड ), ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार अनघा अमोल पाटील ह्या करीत आहेत.