चोकाक येथे उज्ज्वल गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन वाटप



प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले :

चॊकाक (तालुका - हातकणंगले)  येथे उज्ज्वल गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. मुकुंद माळी याच्या वतीने या योजनेचा लाभ देणेत आला.

लाभार्थीना चॊकाक गावचे सरपंच सुनिल चॊकाककर, मा. उपसरपंच प्रविण माळी, महादेव माळी, यांच्या हस्ते गॅस कनेक्शन देण्यात आले. यावेळी गोरे गॅस चे वितरक मुकुंद माळी यांनी सर्व गरजू कुटूंबाना लाभ देणेसाठी कायम कायमस्वरूपी सहकार्य करू असे सांगून ग्रामस्थांना गॅस कनेक्शन चे वाटप करण्यात आले. यावेळी चोकाकचे  सरपंच व  उपसरपंच यांनी आभार मानले.  कार्यक्रमास महिला, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post