प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
चिंचवाड : मातृसंस्था दि बुदिष्ट सोसायटी आँफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चैत्यभुमीचे शिल्पकार सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांची जयंती चिंचवाड (ता-करवीर) बुद्ध विहारा मध्ये उत्सवात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन कोल्हापूर जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष आयु. राजेंद्र भोसले,जिल्हा संस्कार सचिव आयु. संजय सुळगावे सर यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी. केंद्रीय शिक्षिका आयुनी जयश्री भोसले, करवीर तालुका महिला उपाध्यक्ष आयुनी रेश्मा कांबळे,करवीर तालुका कोषध्यक्ष आयु.निलेश कांबळे, करवीर तालुका संस्कार सचिव आयु.निलेश कांबळे आडुरतसेच चिंचवाड येथील उपासक उपासिका मोठया सख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम करवीर तालुका अध्यक्ष आयु. सचिन कदम यांच्या अध्यक्ष मार्गदर्शना खाली संपन्न झाला .