-व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगची मागणी, -घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना दिले निवेदन
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद : -अधिस्विकृतीधारक पत्रकारांना एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे यासह इतर सुविधा मोफत देण्यात याव्यात, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष अब्दुल कय्युम अब्दुल रशीद यांनी घाटी प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवदेन त्यांनी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना दिले आहे.
निवेदनात नमूद आहे, की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय( घाटी ) येथे अधिस्विकृतीधारक पत्रकारांना मोफत उपचार होत नाहीत. शासनाच्या जीआर प्रमाणे सर्व शासकीय रुग्णालयामध्ये अधिस्विकृतीधारक पत्रकारांना मोफत उपचार करण्यात यावा, असे स्पष्ट नमूद आहे. परंतू घाटी रुग्णालयात अधिस्विकृतीधारक पत्रकारांवर मोफत उपचार करण्यात येत नाहीत. येथून पुढे असे होऊ नये. अधिस्विकृतीधारक पत्रकारांना मोफत उपचार देण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. निवेदनासोबत शासनाचे जीआर परिपत्रकसुद्धा जोडलेले आहे. निवेदन देतेवेळी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष अब्दुल कय्युम, सय्यद करीम, एम ए. शकील, अलीम बेग, फय्याज सौदागर आदी उपस्थित होते.उपरोक्त सर्वांच्या निवेदनावर सह्या आहेत.