प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत रथ यात्रेचे रविवार दिनांक दहा-बारा 2023 रोजी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले प्रथमता रथाचे पूजन अतिग्रे गावचे उपसरपंच सौ छाया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्रीफळ लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिग्रे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी माननीय श्री बाबासाहेब कापसे यांनी केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
या विकसित भारत योजनेमध्ये आलेले अधिकारी माननीय श्री अश्विन वासनिक यांनी अतिग्रे गावातील सर्व नागरिकांना शासनाकडून आलेल्या योजनेची माहिती मिळाली का नाही याची संपूर्ण माहिती घेतली व त्या योजनेचा तुम्हा लोकांना लाभ मिळाला का नाही हे जाणून घेतले व सर्व नागरिकांना या योजनेची माहिती सांगण्यात आली यामध्ये विविध योजनेच्या निवड प्राप्त लाभार्थ्यांना शंभर टक्के सवलत मिळाली का नाही याची खात्री केली यामध्ये आरोग्य अ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना रुपये 5000 लाभार्थी निवड एक गीता पाटील ,दोन विशाल लोहार,
ब आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड रेखा दिलीप कांबळे ,संजय गांधी निराधार सचिन मारुती चौगुले ,आय सी डी एस टी एच आर एक पुष्पा अनिल मोहिते ,दोन सोनार सुरज पाटील, गोल्डन कार्ड वाटप बाबुराव दबडे ,बाबासो वड्ड, सविता कांबळे, सजा का पाटील, पी एम वाय घरकुल अभिजीत विठ्ठल नागावकर, या पात्र लाभार्थींना योग्य त्या स्वरूपात शंभर टक्के निधी प्राप्त झाला असे सांगण्यात आले व या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही इतर सर्व नागरिकांना सांगण्यात आली असे या पात्र लाभार्थीने आपल्या मुलाखतीद्वारे सांगितले
विशेष करून या विकसित भारत रथयात्रेच्या अनुषंगाने अतिग्रे गावचे ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे यांनी गावातील सर्व नागरिकांना माहितीसाठी महाराष्ट्र शासन व केंद्रशासन यांच्यामार्फत 81 योजना आहेत त्या 81 योजनेची आठ डिजिटल फलक लावून सर्व नागरिकांना माहिती देण्याचे काम केले आहे त्यांच्या या कामाबद्दल अतिग्रे गावातून ग्रामविकास अधिकारी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांचे कौतुक केले जात आहे
या कार्यक्रमा साठी उपस्थित संचालक माननीय श्री अश्विन वासनिक, अँकर श्री स्वप्निल पवार, रथ सारथी केदारी कानडे ,अतिग्रे सरपंच श्री सुशांत वड्ड , उपसरपंच सौ छाया पाटील ,सदस्य भगवान पाटील ,बाबासाहेब पाटील ,अनिरुद्ध कांबळे ,सदस्या सौ कलावती गुरव, श्रीमती आकाताई शिंदे ,सौ कल्पना पाटील ,सौ दिपाली पाटील ,शासकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे, तलाठी श्री जाधव साहेब, सी एच ओ डॉक्टर उषा राणी खोत ,कृषी सहाय्यक सौ सुतार मॅडम, आरोग्य सेवक श्री महेश वडर, प्रवेशिका सौ पाटील मॅडम, विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर ,उत्तम पाटील, धनाजी पाटील, अमर पाटील ,पत्रकार भरत शिंदे, डॉक्टर एस आर पाटील ,लालासो पाटील ,जावेद दबडे ,अंगणवाडी सेविका मदतीस, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, व सर्व गावकरी उपस्थित होते
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी भरत शिंदे