अतिग्रे येथील घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

अतिग्रे : तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या 2022 -23 विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत जेईई, नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा सत्कार डी.वाय पाटील कॉलेजचे कॉम्प्युटर सेन्टर हेड अप्पासाहेब जाधव, ज्ञानदीप क्लासचे संचालक न.स.नीळपंकर, शिवाजी युनिव्हर्सिटी एक्साम डिपार्टमेंटचे हेड सेवानिवृत्त रमेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी अकॅडमीचे संचालक श्री वासू ,सेंट्रल झोनल हेड श्रीधर गुप्ता , राहुल पाडळकर ,नागेंद्र राव ,सुनील हराळे सर व इतर स्टाफ यांची उपस्थिती होती. 

  अकॅडमीच्या आय आय टी व मेडिकल कोल्हापूर शाखेच्या 40 विद्यार्थ्यांनी जेईई - नीट -2023 या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.अकॅडमीचे IIT,NIT व MH.GOV मध्ये सुमीत गरड (IIT पलक्कड), अर्जुन पाटील (IIT पलक्कड), कार्तीक्येण कुमार (IIT भिलाई), हर्षवर्धन सावंत  (NIT सुरत) , अथर्व तांडे (NIT हैदराबाद),पार्थ ताटपुजे (COEP पुणे), शर्वरी सावर्डेकर (VIT पुणे),अथर्व कवडे (VIT पुणे), ,गौरी पाटील (PICT पुणे), केदार कोळसे (VIIT पुणे), गिरीजा आवटे (PVGs पुणे), पुर्व जैन (CIT बेंगलोर). 

तसेच MBBS व BAMS मध्ये  सादिया काझी ( IIMSR जालना),सना भंडारी (RCSM कोल्हापूर),सूर्याजी पाटील (PIMS सांगली), पूनम खांबे (DAMC कोल्हापूर), गायत्री पाटील (KAMCH संकेश्वर),तेजस्विनी मेणे (KAMCH संकेश्वर), संचीता चव्हाण  (KAMCH संकेश्वर).या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले .

या यशाबद्दल बोलताना अकॅडमीचे संचालक श्री वासू  म्हणाले, आजवर उच्चांकी निकालाच्या जोरावर पालकांचा व विद्यार्थ्यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत व स्टाफ ने दिलेले योगदान याच्या जोरावरच हे यश संपादन झाले आहे.यापुढेही या अकॅडमीची यशस्वी वाटचाल चालू राहील असे बोलून त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

    विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडवत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक श्री वासू , श्रीधर गुप्ता, राहुल पाडळकर ,नागेंद्र राव ,सुनील हराळे व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post