प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-आज कोल्हापूर दौरयांवर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आले होते.ते कोल्हापुरातुन अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात होते.केर्ली च्या अलीकडे सोनतळी नजीक त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांचा स्वीय सहाय्यक रविराज जाधव हे किरकोळ जखमी झाले.
या अपघातानंतर मंत्री सावंत हे दुसरी गाडी घेऊन जोतिबा कडे रवाना झालेत.ते सकाळी गारगोटी येथील रुग्णालयाचे उदघाटन आणि इतर विकास कामाच्या उदघाटनासाठी गेले होते.तेथील कार्यक्रम आटोपून कोल्हापुरात येऊन प्रथम अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाला जात असताना पाठीमागून येणारी फोर व्हीलर गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली.सुदैवाने या अपघातात मंत्री सावंत बचावले.मात्र त्यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते जखमी होऊन त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याने पोलिसांची मोठी धांदल उडाली.