तरडंपरच्या धडकेने एक महिला जखमी.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
कर्जत तालुक्यातील नेरळ -वाकस ते कशेळे बाजार प्रवासा दरम्यान मद्यधुंद डंपर चालकाने वाकस येथे व कशेळे येथील दुचाकी तसेच चार चाकी वाहनाना टोकर देत गाड्यांचा चुराडा करत मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना केल्याची घटना घडली असुन, या घटने मध्ये मंद्यधुंद चालकांनी मोठया प्रमाणात दुचाकी व चार चाकी गाड्यांचे नुकसान केले आहे. तर डंपरच्या धडकेने एक महिला जखमी झाल्याची घटना घडती आहे. सुदैवाने या घटनेत कोणती ही जिवितहानी झाली नसुन. या मंद्यधुंद चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप देत कशेळे पोलीसांचे हवाली केले असुन, कशेळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
प्राथमिक प्राप्त माहितीनुसार मलगंगा कन्ट्रक्शन शेलू येथून माल वाहतूक डंपर हा नेरळ कशेळे मार्गे कोठींबे येथ माल टाकण्यासाठी डंपर क्र. एम एच १६, ए ई ५७७९ हा चालक राम वर्मा हा सायंकाळचे ७. ०० ते ७.१५ चे सुमारास घेऊन जात असताना, प्रथम त्यांनी नेरळ सुप्रिया हॉटेल येथे एका वाहानाला धडक देत पुढे वाकस येथे वाहनाला धडक देऊन कशेळे बाजार पेठेतील उभ्या असलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनानां व एका महिलेला धडक दील्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणती जिवितहानी झाली नसुन, या घटने मध्ये होंडा सफाहान क्र. एम एच ०६, १०२५, स्प्लेंडर क्र. एम एच ४६ ए वाय २९३१, एक्टिवा -६४ क्र. एम एच ०५ एफ ए ४०१८, स्कूफ्र क्र.एम एच ०६, ६४ - ८७२०, शाईन क्र. एम एच ४६, बी ८६४३, डिस्कवर क्र. एम एच ४६, ए एम ०५ ६१, एक्टिवा क्र. एम एच ४६, बी आर ०५३४, एक्टिवा क्र.एम एच ०६, बी एक्स ५७०९ एकुण नऊ दुचाकी व व्हॅगनार क्र. एम एच ०१, सी एफ ३३२६, स्कार्पिओ क्र. एम एच ०५, एफ जी ४४०० अशI दोन चार चाकी वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर संतप्त नागरिकांनी या डंपर चालकाला पकडले असता, सदर डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले , सदर डंपर चालकाला चांगला चोप देत कशेळे पोलीसांच्या ताब्यात दिले असुन, कशेळे पोलीस ठाण्यात या डंपर चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर डंपरच्या मालकाचे नांव सागर रसाळ असल्याचे समोर आले आहे.