प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:- ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, शारजा मध्ये "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड" या लघुपटाची नोंद झाली आहे. हा लघुपट डॉ. तुषार निकाळजे यांच्या शैक्षणिक व संशोधनपर जीवनावर आधारित आहे. डॉ. निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेतर- कर्मचारी म्हणून काम करीत होते. ते सध्या सेवानिवृत्त झाले आहेत. डॉ. निकाळजे यांनी 12 पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. त्यामधील दोन पुस्तके महाराष्ट्रातील सात विद्यापीठांच्या बी. ए व एम. ए अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर दृष्टीहीन व्यक्तींकरिता "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे ब्रेल इंग्रजी- पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. निकाळजे यांनी नोकरी करीत असतानाच पुस्तक लेखन, 78 लेख, पाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये शोध निबंध सादर केले आहेत. हे सर्व डॉ. निकाळजे यांनी स्वखर्चाने केले आहे. या सर्व शैक्षणिक व संशोधनपर कार्याची दखल घेऊन राजस्थान, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, लंडन, अमेरिका येथील शैक्षणिक व संशोधन संस्थांनी १६ पुरस्कार प्रदान केले आहेत. डॉ. निकाळजे यांनी हे सर्व कार्य करीत असतानाच कार्यालयीन जबाबदारी, घरगुती व सामाजिक जबाबदारी देखील सांभाळली आहे. जुलै 2023 मध्ये या सर्व कामाची निर्मिती क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड या लघुपटाची निर्मिती व लेखन डॉक्टर निकाळजे यांनी केले आहे. डॉ. निकाळजे यांची नुकतीच संपादक व लेखक म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या सर्व कार्याचा उपयोग भावी पिढीला प्रोत्साहनपर ठरावा म्हणून या "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड" लघुपटाची निर्मिती केली गेली आहे.
ब्रावो इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, शारजा मध्ये "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड" या लघुपटाची नोंद झाली आहे .
तसेच यापूर्वी या चित्रपटाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
या लघुपटाच्या यशस्वी दिग्दर्शनाबाबत श्री. शुभम महादेव या दिग्दर्शकाला गोवा येथील 24 फिल्म फेस्टिवल संस्थेने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.
याप्रसंगी शोभा इंटरटेनमेंट चे श्री. प्रदीप कुमार यांनी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ यांचे अभिनंदन केले व आभार मानले.
Tags
पुणे