कर्जत किरवली येथे इनवाकारचा पुलावरून पडून आपघात, पत्रकार धर्मानंद गायकवाडसह त्यांचे दोन मावस भाऊ यांच्यावर काळाची झडप तर दोन जन जखमी,


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

कर्जत : - कर्जत तालुक्यातील नावलौकीक पत्रकार  धर्मानंद गायकवाड यांच्या इनवाकारला आज दि. ७ नोव्हेंबर रोजी  पाहाटे सुमारास किरवली गावाच्या हद्दीतील कर्जत - कल्याण राज्य मार्गावरील पनवेल - कर्जत  रेल्वे लाईन वरील पुलावरून खाली पडून आपघात झाला आहे. या अपघाता मध्ये पत्रकार धर्मानंद गायकवा  व त्यांच्या दोन मावस भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इनवा कार मधिल दोन जन जखमी झाले असुन, त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कर्जत तालुक्यातील असल गावातील राहणार धर्मानंद  यशवंत गायकवाड यांचे मुळ गाव असल असुन, ते सध्या नेरळ मधिल राजेंद्रगुरू  नगर येथे स्थायीक होते. धर्मानंद गायकवाड यांनी पत्रकारीमध्ये आपला चांगलाच ठसा उमटवला होता. तर ते नेरळ ग्रामपंचायती विद्यमान सदस्य तसेच ते आर पी आय पक्षाचे रायगड जिल्हा संर्पकप्रमुख पदाची जबाबदारी संभाळत होते. धर्मानंद गायकवाड त्यांची इनवाकार नंबर एम एच .बी आर. ४२६१ या मधून त्यांचे मुंबई व ठाणे येथील  मावस भाऊ व त्यांचे दोन मित्र यांच्या सह दि. ६ नोव्हेंबर रोजी मध्य रात्रीचे सुमारास  मुंबई - पनवेल मार्गे नेरळ कडे प्रवास करीत असताना, दि. ७ नोव्हेंबरच्या अंदाजे पाहाटेच्या ३.३० ते ४.०० वाजण्याचे सुमारास त्यांची इनवाकार  कर्जत - कल्याण राज्य मार्गावरी पनवेल - कर्जत  रेल्वे लाईन वरील असलेल्या पुलावरून साधारण ३५ ते ४० फुट  खाली पडून आपघात झाला आहे. सदर अपघात इतका भिषण होता की कर्जत - पनवेल रेल्वे लाईनवरून कर्जत स्थानकाच्या दिशेने मार्गस्त असलेल्या मालगाडीला जाऊन त्यांची इनवाकार धडकली असल्याने, व या अपघाता मध्ये पत्रकार धर्मानंद यशवंत गायकवाड वय वर्ष ४१, रा. नेरळ   यांच्यासह त्यांचे मावसभाऊ मंगेश मारिया जाधव वय वर्ष ४६ रा. मंबई व नितिन मारूती जाधव वय वर्ष ४८,रा. ठाणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे  पत्रकार मित्र जयवंत हाबळे व सहकारी संतोष जाधव हे जखमी झाले असुन, पत्रकार जयवंत हाबळे यांच्यावर पनवेल येथील पुरोहीत हॉस्पिटलमध्ये तर त्यांचे सहकारी संतोष जाधव यांना एम जी एम रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post