खासदर शरद पवार यांनी राज्य सरकारसोबत चर्चा करून मुस्लिम आरक्षणाचा विषय मार्गी लावा;सलीम सारंग (ऑल इंडिया उलेमा वक्फ बोर्ड विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
महाराष्ट्र दि. 6 नोव्हेंबर ऑल इंडिया उलमा बोर्डच्या वतीने ऑल इंडिया उलेमा वक्फ बोर्ड विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या नेतृत्वात मुस्लिम आरक्षण, उर्दू शाळांतील शिक्षण तसेच मुस्लिम समाजाशी निगडित इतर विषयांबाबत शिष्टमंडळाने देशातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच, या संदर्भात आपण पुढाकार घेऊन राज्य सरकारसोबत चर्चा करून मुस्लिम आरक्षणाचा विषय मार्गी लावणे तसेच राज्यातील शासन व प्रशासनाच्या उर्दू माध्यमांच्या शाळेत अरेबिक भाषेचे शिक्षण देणे बंधनकारक करण्यासंदर्भातील पत्र दिले.
ऑल इंडिया उलेमा बोर्ड अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मुस्लिम समाजाला शिक्षण संदर्भात जागृत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जाणार आहे ,तसेच मुस्लिम समाजाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा व त्यांना मार्गी लावण्याचा काम ऑल इंडिया उलमा बोर्ड सदैव प्रयत्नशील राहील अशी माहिती ऑल इंडिया उलेमा वक्फ बोर्ड विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी दिली
यावेळी ऑल इंडिया उलेमा बोर्ड विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मौलाना नौशाद अहमद सिद्दीकी, ऑल इंडिया उलेमा वक्फ बोर्ड विभागाचे राष्ट्रीय महासचिव अल्लामा बुनाई हसनी, महासचिव मौलाना शमीम अख्तर, अकरम तेली, राष्ट्रीय उपाध्यक्ष वक्फ विंग ऑल इंडिया उलमा बोर्ड, ऑल इंडिया उलेमा बोर्ड विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष - सलीम सोपारीवाला, ऑल इंडिया उलेमा बोर्ड विभागाचे मुंबई अध्यक्ष क़ादरी सूफ़ी अहेमद रज़ा, महाराष्ट्र उलेमा बोर्डाचे सदस्य, हाफ़िज़ अब्दुल रशीद इत्यादी उपस्थित होते.
Tags
पिंपरी चिंचवड