रसायनी विभागातील कामगारांना न्याय मिळणार


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील 

रसायनी पाताळगंगा विभागातील एचपीसीएल कंपनीमध्ये स्थानिक माथाडी कामगारांना संधी मिळावी म्हणून तेथील स्थानिक गेली 40 पेक्षा जास्त दिवसापासून उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. आज तहसील कार्यालय पनवेल येथे आमदार बाळाराम पाटील साहेब आमदार मनोहर भोईर साहेब यांच्या समक्ष तहसीलदार श्री विजय पाटील यांच्या उपस्थितीत कंपनी प्रशासन ,माथाडी युनियनचे पदाधिकारी, स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अनेक जण उपस्थित होते.

संपूर्ण देशभरामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे अशा पद्धतीची मागणी होत असताना किंबहुना बऱ्याच ठिकाणी 80 टक्के प्रकल्पग्रस्तांना संधी मिळत असताना एचपीसीएल प्रशासनाने स्थानिक कामगारांना विचारात न घेता कामकाज चालू ठेवलेले आहे. या विरोधात गेली अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि तरीही कंपनी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती या बैठकीमध्ये आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांना डावलून  देणार नाही त्याचं नियोजन करावाच लागेल त्यांचा तोह हक्क आहे.मनोहरजी भोईर यांनी देखील आंदोलनाचे स्वरूप बदलायची गरज लागली तर तेही करू असे स्पष्ट सांगितलं.
आज झालेल्या बैठकीत कामगाराच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा होऊन लवकरच मार्ग निघेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.पुढील दोन दिवसात स्थानिक कामगार प्रत्यक्ष कामावर रुजू होतील अशा पद्धतीचा शब्द कंपनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला. मात्र प्रत्यक्ष दिलेला शब्द कृतीमध्ये उतरत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी ठेवली.
       
 तहसील कार्यालयात पार पडलेल्या आजच्या या बैठकीला मा.आमदार बाळाराम पाटील साहेब ,मा.आमदार मनोहर भोईर साहेब , वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी साहेब, साहे शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, श्रुतीताई म्हात्रे ,सुनीलजी सोनावले,रजनीकांत माळी,महेश टकले , अशोकजी मुंढे
प्रशांत गायकवाड,रवींद्र कोंडीलकर,काशिनाथ निकम ,रमेश सावंत,मंगल्या पवार ,संतोष पाटील,किरण पाटील कंपनीच्या वतीने विश्वास कमाने, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post