महापारेषाणच्या कार्यकारी अभियंताची आत्महत्या.


प्रेस मीडिया लाईव्ह : 
मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर- अमरावती येथे महापारेषा विभागात कार्यरत असलेले सुनिल शिवराज माने (वय 55.रा.रंकाळा,तळेकर कॉलनी,को.) यांनी रहात्या घरी ओढ़णीने गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांना घटना स्थळी सुसाईट नोट आणि एक डायरी सापडली आहे.त्यातील मजकूर आणि हस्ताक्षराची सत्यता पडताळण्यात येत आहे.माने मुळचे कोल्हापुरचे असून ते अमरावती येथे नोकरीस होते.ते दोन-तीन दिवसापूर्वी कोल्हापूरास आले होते.त्यांच्या आत्महत्याच्या घटनेने त्यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.रुग्णालयाच्या आवारात नातेवाआईकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post