प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सद्यस्थितीत शहरातील ड्रेनेज लाईन सफाई करिता पद्धतीचा अवलंब करणेत येतो. तथापि आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहरातील ड्रेनेज सफाई करिता आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची माहिती घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रेनेज लाईन सफाई करणे बाबतच्या सूचना कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांना दिल्या होत्या.
या अनुषंगाने आज मंगळवार दि.२१ नोव्हेंबर रोजी आर्यन पंप अँड सोल्युशन पुणे या कंपनीच्या माध्यमातून आत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले सक्षन,जेटिंगसह मशीन वॉटर रिसायकलिंग सिस्टीम (पाण्याचा पुनर्वापर) या मशीनचे प्रायोगिक तत्वावर प्रात्यक्षिक घेणेत आलेले आहे. मशीनच्या कार्यप्रणालीची तपासणी करणेसाठी सदर मशीनचा वापर दोन दिवस शहरातील ड्रेनेज लाईन सफाई करण्यासाठी करणेत येणार आहे.
या मशीनची चाचणी यशस्वी झाली असून सदरचे मशीन खरेदी अथवा वार्षिक भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून सदर मशीनच्या वापरामुळे ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रमाण नगन्य राहणार असून ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी या पूर्णपणे मनुष्य विरहित असलेल्या मशिनरीचा वापर येत्या काळात इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे
यावेळी कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, अभियंता अभय शिरोलीकर,बाजी कांबळे ,आर्यन कंपनीचे प्रतिनिधी विक्रम गायकवाड, स्वच्छता निरीक्षक , सुर्यकांत चव्हाण, संजय भोईटे, विजय पाटील, रफिक पेंढारी यांचेसह आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
नितिन प्र.बनगे
माहिती व जनसंपर्क अधिकारी
Tags
इचलकरंजी