कोल्हापूर शहरातील रस्त्यांबाबतची वस्तुस्थिती



प्रेस मीडिया लाईव्ह : 
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले : 

कोल्हापूर  :  कोल्हापूर हद्दीमध्ये मागील 2  वर्षापासून अमृत योजनेअंतर्गत विविध ठिकाणी पाईपलाईन व ड्रेनेजसाठी रस्ते खुदाई करण्यात आलेले होते. तसेच विभागीय कार्यालय क्र.3 व  4 अंतर्गत गॅस पाईपलाईन खुदाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वेळोवेळी वैयक्तिक पाण्याच्या, ड्रेनेजचे कनेक्शन घेण्यासाठी व इतर कारणांसाठी रस्त्यांची खुदाई करण्यात आलेली आहे. अमृत योजनेअंतर्गत रिस्टोलेशनची कामे ही संबंधीत कंपनीने करणे बंधनकारक आहे. 

तथापी कंपनीने शहरातील 27 किलोमिटर खुदाई केलेल्या रस्त्यांवर  रिस्टोरेशनचे काम केलेचे दिसून येत नाही. तसेच विभागीय कार्यालय क्र.3 व  4 अंतर्गत गॅस पाईपलाईनच्या रिस्टोरेशनची कामे निविदा प्रक्रिया राबवुन सुरु करण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त कोल्हापूर महानगरपालिकेस महाराष्ट्र शासन व जिल्हा नियोजन समितीकडून रस्तेसाठी निधी उपलब्धतेप्रमाणे निविदा काढून काम पुर्ण करुन घेण्याची कार्यवाही केली जाते. सद्य स्थितीत उपलब्ध झालेल्या निधीमधून अंदाजे 199 कामे प्रस्तावित केलेली असून यापैकी 140 कामांच्या वर्कऑर्डर झालेल्या आहेत. त्यापैकी 32 कामे सुरु असून 9 कामे पुर्ण केलेली आहेत. उर्वरीत कामे सुरु करण्याच्या सक्त सूचना संबंधीत विभागीय कार्यालय व ठेकेदारांना देण्यात आलेल्या आहेत.

 या पुर्वी केलेले जे रस्ते दोषदायीत्व कालावधीमध्ये आहेत त्या रस्त्यांच्या ठेकेदारांना दोषदायीत्व कालावधीत रस्ते पुर्ण करण्यासाठी चारही विभागीय कार्यालयामार्फत 12 ठेकेदारांना दंडासहीत नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. दिलेल्या मुदतीत ठेकेदारांनी काम पुर्ण न केलेस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन शासन निर्णयाप्रमाणे पुढील कारवाई करण्याच्या सक्त सूचना उप-शहर अभियंता यांना दिलेल्या आहेत. तसेच बरेच ठेकेदारांकडून कामे मंजूर झाली असून सुध्दा कामाचा करार न केलेने वर्कऑर्डर दिली नसलेचे दिसून आले असून अशा ठेकेदारांनी पुढील दोन दिवसात सदर कामांचा करर न केलेस त्यांच्यावर कारवाई करुन कामे रद्द करुन फेर निविदा करण्यात येतील.      

आज अतिरिक्त आयुक्त रविकांत यांनी मिरजकर टिकटी ते नांगिवली चौक येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईनच्या खुदाईच्या कामानंतर रिस्टोरेशनची कामे केलेली नसलेचे निदर्शनास आले. ती कामे त्वरित सुरू करणेबाबत संबंधीत कंपनीला सूचना दिल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी भेटून सदरचे पॅचवर्कचे काम लवकर सुरू करण्यात येत असलेचे सांगितले. या ठिकाणी उद्यापासून काम सुरू करत असलेचे दास ऑफशोअर चे प्रतिनिधी यांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता हर्शजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, पाणीपुरवठा विभाग शाखा अभियंता संजय नागरगोजे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, दास ऑफशोर चे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post