प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
2024: रशिया- युक्रेन युद्धानं सा-या जगाची झ उडवलीय. मात्र कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित एका भविष्येत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्त्याचं नाव आहे नॉस्ट्रडॅमस.2024 वर्ष अत्यंत भयानक असेल. नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणी पेक्षा जास्त डेंजर आहे.
अमेरिकेत अंतगर्त कलह
अमेरिकेत सध्या पूर्वीपेक्षा जास्त अंतर्गत कलह पहायला मिळत आहेत. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेला अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत सध्या मोठ्या वादविवाद होत आहेत, अशा स्थितीत अमेरिकेत गृहयुद्ध येऊ शकते अशी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध
चीन महसत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात स्पर्धा सुरु आहे. या जोन देशांमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. या शीतयुद्धाचे प्रत्यक्ष युद्धात रुपांतर होण्याचे भाकित वर्तवले आहे. नॉस्ट्रॅडॅमस त्याच्या भविष्यवाण्यांमध्ये युद्धे आणि नौदल युद्धांबद्दल भाकित केले आहे. हे युद्ध जगासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.
ग्लोबल वार्मिंग मानवासाठी धोकादायक
हवामान बदलाचा भयानक परिणमा मानवावर होवू शकतो. भयानक चक्रीवादळे, जंगलातील आग आणि सतत वाढत जाणारे तापमान मानवासाठी धोकादायक ठरू शकते. चाळीस वर्षानंतर इंद्रधनुष्य दिसणार नाही. वाढत्या तापमानमुळे कोरडी पृथ्वी पडेल. मोठा पूर येईल. 2024 मध्ये अणु स्फोटाचा इशारा देतो याचा परिणाम हवामानावर होईल असे भाकित नॉस्ट्रॅडॅमसने केले आहे.
500 वर्षांपूर्वीच युद्धाचं भाकित
नॉस्ट्रॅडॅमसनं 2022 मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होईल असं भाकित वर्तवलं होते ते खरं ठरलं. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धानं संपूर्ण जगाला चिंतेत टाकले. हे युद्ध अद्याप शमलेले नाही. २०२०मध्ये महाभयंकर महामारी येईल हे त्यानंच सांगितलं होतं.
नॉस्ट्रॅडॅमसनं भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं. कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकितं खरी ठरली आहेत. नॉस्ट्रॅडॅमसने त्याच्या पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली आहेत.
बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात
नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच त्यांनी या भविष्यवाणी करून ठेवल्यात. विशेष म्हणजे ही भाकितं कुठेही लिखित स्वरुपात नाहीत. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. 2024 वर्षासाठी देखील बाबा वेंगाने धोकादायक भविष्यवाण्या केल्या आहेत.