प्रो कबड्डी टेक्निशियन आणि प्रमुख कोच यांनी दिली श्री दत्त साखर कारखान्याला सदिच्छा भेट



प्रेस मीडिया लाईव्ह : 

शिरोळ/प्रतिनिधी:

   प्रो कबड्डी टेक्निशियन आणि प्रमुख कोच यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित  गणपतराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

  

टेक्निकल डायरेक्टर ई. प्रसादराव म्हणाले, दत्त चेअरमन गणपतराव पाटील यांनी मातीतल्या कबड्डी खेळाला उभारी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहेत. तसेच निर्जीव शेतातील मातीलाही नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक काम ते करीत आहेत. आपल्या भागात प्रो कबड्डी स्पर्धा किंवा आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. प्रो कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

     यावेळी प्रो कबड्डी आणि स्टार स्पोर्ट्सचे श्री नटराजन, मिस मैत्री राव, विश्वास मोरे, ओंकार प्रभू, राहुल सर, रमेश भेंडिगीरी तसेच शिरोळ नगरीचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्त कारखाना कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंच उपस्थित होते. 

प्रारंभी स्वागत श्री गावडे सर यांनी केले. सुत्रसंचालन शेखर कलगी यांनी केले. युनियनचे अध्यक्ष प्रदीप बणगे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post