खारघर मध्ये सिडकोची जोरदार कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
खा रघर - कोपरा परिसरातील सेक्टर १० परिसरात भंगार गोदाम, हॉटेल, बार, रेस्टॉरंट धारकांनी कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केले होते.पनवेल ग्रामीण, खारघर, कोपरा यथे बार आणि रेस्टोरंट करिता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोच्या वतीने मंगळवारी (ता.28) कारवाई करण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत करण्यात आलेल्या या कारवाई बाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खारघर - कोपरा परिसरातील सेक्टर १० परिसरात भंगार गोदाम, हॉटेल, बार, रेस्टॉरंट धारकांनी कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केले होते.
या अनधिकृत बांधकामांस सिडको विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. या अनधिकृत बांधकामावर सिडको अतिक्रमण विभाग यांच्याकडून कारवाई करण्यात आली. त्यानुसार अनधिकृत बांधकाम पोकलेनच्या साहाय्याने पुर्णत: जमीन धस्त करण्यात आले