अपघातास निमंत्रण देणाऱ्या अनाधिकृत पार्किंग कडे कोणी लक्ष देईल का..?
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
एमआयडीसी पातtलगंगा एरिया रिलायन्स ही मोठी कंपनी असून या कंपनीच्या कामगाराने थेट एमआयडीसीचा रोडवर गाड्यांचा थाट रोजच्या रोज एमआयडीसी रोडवर लावण्याचा प्रकार सध्या जोरात चालू आहे .अपघातास निमंत्रण देणाऱ्या अनाधिकृत पार्किंग कडे कोणी लक्ष देईल का..?
एमआयडीसी एरिया एवढा मोठा असून आजूबाजूच्या कंपन्या परिसर मोठा असल्यामुळे गाड्यांची आवक जावक जास्त आहे यामुळे रिलायन्स काटा गेट येते लावलेल्या ज्या गाड्या बेकायदेशीर रित्या पार्किंग करत आहेत जर उद्या अपघात वगैरे झाला तर याला जबाबदार कोण ? रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कंपनी एरिया तसा एमआयडीसी एरिया येत असून येथे रोड वरती गाड्या पार्किंग करणे कायदेशीर गुन्हा आहे .
संबंधित रसायनी पोलीस स्टेशन याकडे थोडा बारकाईने लक्ष टाकून बेकायदेशीर पार्किंग रोडवर उभ्या केलेल्या गाड्यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच रिलायन्स काटा गेट येथील संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे रोड वरती पार्किंग करून नये अन्यथा कारवाई केली जाईल असे रसायनी ट्राफिक पोलिसांच्या माध्यमातून सूचना जर दिल्या तर रोड खुल्ले होण्यास मदत होईल व पुढील होणाऱ्या अपघात वगैरे टळू शकतात