प्रेस मीडिया लाईव्ह :
दिवाळीच्या सण भाऊबीज हा अनोख्या पध्दतीने उदयकाळ फाउंडेशन या सामजिक संस्थेने साजरा केला. कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रेशन धान्य किट वाटप करुन त्यांना भाऊबीज भेट देण्यात आली.
उदयकाळ फाउंडेशनचे उपाध्यक्ष निलेश बागुल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कोविड मुळे पतीचे निधन झाले आणि महिला एकल झाली. कुटुंबातील सर्व जबाबदारी ही महिलेवर आली त्यात दिवाळी सारखा आनंदाचा सण साजरा करतांना घरात मुलांना दिवाळी फराळ तरी करुन खाऊ घातला पाहिजे हा संकल्प घेऊन महिलांना धान्य किट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आंतर भारती पुणे शाखेचे उपाध्यक्ष श्री. राम माने, उदयकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बागुल, श्री. सचिन बागुल, सौ. शर्मिला सुळ, सौ. प्रभावती बागुल आणि सौ. मंजुळा बागुल हे उपस्थित होते.
कार्यक्रमात एकल महिलांनी आपले मत व्यक्त करतांना भावुक होऊन संकट काळात नेहमी सोबत असणारे उदयकाळ फाउंडेशन या संस्थेने उपक्रम घेऊन आम्हांला भाऊबीज साजरा करण्यासाठी बोलवले तसेच कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने मुलांचा विचार करुन फराळ करण्यासाठी धान्य दिले त्यामुळे महिलांनी सर्व देणगीदार यांचे आभार मानले.
समाजातील संवेदनशील व्यक्तीमुळे जगण्याला बळ मिळते आणि त्यासाठी देणगीदार यांनी जे सहकार्य केले त्यामुळे खऱ्या अर्थानं दिवाळी गोड झाली असे मत कोविड एकल महिलांनी मांडले.
या उपक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले ते समाजातील देणगीदार यांचे उदयकाळ फाउंडेशन संस्थेने आभार मानले.