प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पुणे : कामावर आला नसल्याबाबत सासऱ्यांच्या समोर बोलल्याचा राग आल्याने एका तरुणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली . कोंढवा भागात राहणाऱ्या तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तोहिद शेख असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी स्वतःचा व्हिडिओ बनवत त्याने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेने जोरदार खळबळ उडाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुणे येथील कोंढवा परिसरात राहणारा तोहिद शेख हा शेख हा अरबाज वली मोहम्मद मेमन यांच्याकडे ड्रायव्हर व सुपरवायझर म्हणुन 4 वर्षांपासून नोकरीस होता. त्यांच्यामध्ये काल कामावर न आल्यावरुन वाद झाला होता. यावरुन अरबाज वली याने तोहिद शेखला त्याच्या सासऱ्यासमोर शिवीगाळ केल्याने.त्याला हा अपमान सहन न झाल्याने तोहिदने कोसर बाग येथील काम चालु असलेल्या 6 व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तरुणाने स्वतःचा व्हिडिओ शूट केला असून त्यामध्ये त्याने यामागचे कारण सांगितले आहे.
दरम्यान, तोहित याने सावकाराच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी सावकारीचा कोणताही विषय नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, तोहिद शेखच्या पश्चात दीड दोन वर्षाचा मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार असून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी केली आहे . या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी घेतली असून अधिक तपास सुरु आहे.