पुणे मनपातील रजा मुदत शिक्षण सेविका भगिनींना कायम आदेश हीच "भाऊबीज भेट " म्हणून देणार.- मा.ना .चंद्रकांत दादा पाटील

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे  यांचे हार्दिक आभार


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे मनपा मधिल ९३ रजा मुदत शिक्षकांच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (श्री. प्रकाश शिंदे व सायली दरेकर /दळवी यांच्या)सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संघनिष्ठ शिलेदार श्री प्रकाश शिंदे यांनी चार दिवस उपोषण केले होते. ते बेमुदत उपोषण सोडते वेळी तत्कालीन पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी आयुक्त ,अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा यांच्या समवेत झालेल्या बैठकीत रजा मुदत शिक्षण सेवकांना कायम करण्याचे निर्देश नगर विकास खात्याच्या पत्राद्वारे पुणे मनपा देण्याचे प्रयत्न करण्याची हमी दिली होती , त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. एकनाथ रावजी शिंदे यांच्या मान्यतेने नगर विकास खात्याचे 93 रजा मुदत शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशान्वये कायम करण्याचे आदेश मा. आयुक्त पुणे महानगरपालिका यांना पाठवण्यात आले. त्या अनुषंगाने  मा . चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, मा.पालकमंत्री यांची आज भेट घेतली.




पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी 93 रजा मुदत शिक्षकांच्या कोर्ट निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर विकास विभाग यांना निवेदन पाठवून विचारणा केली होती .यासंदर्भात माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सो .यांच्याशी चर्चा करून त्यासंदर्भामध्ये पत्र काढण्यास बहुमोल मदत केली. यासाठी माननीय चंद्रकांत दादा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त करण्यासाठी आणि या निर्णयाची अंमलबजावणी मनपा स्तरावरून नगरविकास विभागाचे पत्रानुसार तातडीने करून सर्व रजा मुदतील शिक्षकांना कायम सेवेची ऑर्डर देण्यासाठी आयुक्त यांना आदेशित करावे अशी विनंती करण्यात आली.



त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून मंत्री महोदयांनी भाऊबीजेला रजा मुदत शिक्षण सेविकांना कायम आदेश मनपा इमारतीत देऊन मोठ्या भावाकडून भेट देण्याचा संकल्प व्यक्त केला आणि त्यानुसार कार्यवाही करण्याचे सूचित केले. दादांचे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे  ऐकताना पंधरा वर्षातील संघर्ष आठवून बबलू सरांसारख्या  सहकाऱ्यांच्या  डोळ्यात अश्रू उभे राहिले.

 सदर प्रसंगी मा.मंत्री महोदय यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सचिन डिंबळे शिक्षक नेते तथा कार्य.राज्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य मनपा नप प्राथमिक शिक्षक संघ, महेंद्र दळवी - जिल्हा अध्यक्ष - नपा,मनपा,पुणे जिल्हा.प्रकाश शिंदे , हर्षल दारकुंडे, बबलु भाई सय्यद व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.*

    *शिक्षक संघाच्या इतिहासातील या एका पंधरा वर्षांच्या ऐतिहासिक लढ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि आम्हाला याचा अभिमान आहे. या कामी मदत केलेल्या सर्व अधिकारी , विविध पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक संघाचे सर्व आजीव सभासद व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.



Post a Comment

Previous Post Next Post