पुणे- दिवाळी सणाच्या निमित्ताने दै. प्रभात आयोजित ' दिपस्वर ' दिवाळी पहाट चा कार्यक्रम ६.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला..
भले पहाटे ६.०० वाजता मराठी गीतांचा कार्यक्रम हाऊसफुल होणे हे ऐकून होतो मात्र मागील दोन वर्षांपासून डोळ्यांनी पाहत देखील आहे. यंदा गायक ज्ञानेश्वर मेश्राम, सोनाली कर्णिक अभिषेक मारोटकर यांच्या आवाजांनी मैफलीत जादू आणली. प्रत्येक गाण्यावर टाळ्यांचा कडकडाट, वन्स मोअर, डान्स आणि लावणी गाण्यांवर शिट्या हे चित्र पाहण्यासारखे होते. मागील वर्षी प्रमाणे या वर्षीही मनात ती खदखद होत आहे. पुण्यात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट चे कार्यक्रम पार पडत आहेत 'आपल्या येरवड्यामध्ये कधी' ?
प्रभात वृत्तपत्राच्या वाचकांसाठी अप्रतिम संगीताच्या मेजवानीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रभात वृत्तपत्राचे संपादक, सर्व पत्रकार व सहकारी टीम चे मनापासून आभार व्यक्त करतो
मनोज शेट्टी (बीए इन पॉलिटिकल सायन्स)
प्रभाग क्रमांक 9 येरवडा, पुणे शहर
8411852210