प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
ओला व उबर बाबत
1) पुणे RTA कॅब चे दर निश्चित करेल व ते दर कंपन्या लागू करतील.
2) एव्हरेस्ट फ्लीट सारखे व इतर खासगी वेंडर व सामान्य कॅब/ रिक्षाचालकांमध्ये भेदभाव होत असेल तर RTO त्याची माहिती घेईल. व गरज वाटल्यास उचित कारवाई करेल.
3) पांढऱ्या नंबरप्लेट च्या खासगी संवर्गात मोडणाऱ्या गाड्यांना सर्व ॲप्स ने २ आठवड्याच्या मुदतीत बंद करण्याचे आदेश DyRTO ने आज दिले.
4) कंपन्या परस्पर चालकांना ब्लॅक लिस्ट करत असल्यास त्याची शहानिशा न करता त्यांनी तसे करू नये.
स्विगी- झोमॅटो बाबत
सदर बैठकीला बोलवून ही झोमॅटो चा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याशी समन्वय साधून सदर कंपन्याच्या बाबतीत कामगारांना असलेल्या प्रश्नांबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले .
सदर बैठकीस निवासी जिल्हाधिकारी पुणे ज्योती कदम पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर सहाय्यक कामगार आयुक्त दत्ता पवार, कामगार संघटनांचे प्रतिनधी, डॉ. केशव नाना क्षीरसागर, वर्षाताई शिंदे, माऊली नलावडे, विनोद घुगे, अजय मुंढे, फय्याज मोमीन, स्वप्निल लोंढे, अमन कुचेकर, वैभव इंगळे व इतर उपस्थित होते.