पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांसाठी पोलीस मानवंदना व भव्य चित्रकला स्पर्धांचे आयोजन .

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : 

पुणे : रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता सारसबाग येथे होणा-या मानवंदने नंतर  चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.   देशभक्तीपर व सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी.

 

ही स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. गट अ : १ली ते २री, गट ब : ३री ते ४थी याकरिता रंगभरण आणि गट क : ५वी ते ७वी , गट ड : ८वी ते १०वी व खुल्या गटात दिलेल्या विषयावर स्पर्धा होईल. स्पर्धकाने रंग व साहित्य स्वत: आणायचे असून कागद देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लगेचच दुपारी १२ वाजता स्पर्धास्थळी होणार आहे.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९९२२९६७८५२, ९८८१७९८१८२, ८८८८७७९३९३, ९८९०९३२६९३  या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेचे परीक्षण कला क्षेत्रातील मान्यवर करणार आहेत. ज्या शाळेतील सर्वाधिक स्पर्धक सहभागी होतील, त्या शाळेला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. शाळांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या नावांची यादी करुन संबंधित पोलीस स्टेशनमध्ये पाठवावी. तरी जास्तीत जास्त पुणेकर, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा हि विनंती.

Post a Comment

Previous Post Next Post