प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती व संविधान जनजागृती अभियानांतर्गत कोंढवा या ठिकाणी सिकंदर पठाण(सर) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला . महामाता रमामाई भिमराव आंबेडकर स्मारकाचे मुख्य समन्वयक मा.विठ्ठल गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच प्रमुख वक्ते पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर) हे होते
ते जनतेला संबोधित करताना म्हणाले की जस मानवाच ह्रदय जिव वाचवण्यासाठी महत्त्वाचे आहे तस देशाच संविधान हे ह्रदय आहे आणि देश वाचवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे म्हणून संविधानाचे वाचन प्रचार प्रसार करण्यासाठी नागरिकांनी कटीबद्ध राहणे कालाची गरज आहे सर्व धर्माचे धर्म संभाळण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देत आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला राहण्याचा बोलण्याचा खाण्याचा समनतेचा अधिकार संविधानाने दिला आहे म्हणून २६ नोव्हेंबरच्या दिवसी प्रत्येक भारतीयानी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन घरा घरातून तसेच आपल्या सार्वजनिक परीसरात सुद्धा आपले प्रथम कर्तव्य म्हणून केले पाहिजे आणि सरकारने पण संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी कटीबध्द राहिले पाहिजे तसेच भारतदेशामध्ये हिंदु-मुस्लिम ऐकता राहण्यासाठी आग्रही राहून भारतीयांना संदेश देणारे खरे नेते मौलाना आजाद होते त्यांनी त्यांच्या पेपर मधून सतत हिंदु मुस्लिम एकता बद्दल लिखाण करून जनतेमध्ये जागरूक मोहीम राबवत होते याचा प्रचंड राग इंग्रजांना होता म्हणून त्यांना सतत इंग्रज झेलमध्ये टाकत असत तरी न घाबरता देश हितासाठी कारावासात भोगत होते एक मुस्लिम नेते म्हणून असताना भारत देशावर प्रचंड प्रेम भक्ती होती त्यांच्याबद्दल नेहरू, महात्मा गांधी त्यांच्या विचाराने प्रेरित होते मरणोत्तर त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केली आहे असी महत्त्वाची महीती देत फिरोज मुल्ला(सर) यांनी सांगितले
सुत्रसंचालन चाँदभाई बलबट्टी यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन निसार क्लिनिकचे अध्यक्ष हाफिज शेख यांनी केले यावेळी अबुल कलाम सर,आस्लम पठारे, आन्नवर बागवान, हुसेन पाशापुरे,युसुफ शेख,कुमेल रजा,राशीद सर,आदी संविधान प्रेमी उपस्थित होते