प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे प्रतिनिधी :
पुणे : मौलाना आजाद यांची जयंती महामाता भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी जनतेला संबोधित करताना म्हणाले मौलाना आजदांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार समजून घेणे कालाची गरज आहे वयाच्या १२व्या वर्षी ते एका पेपरचे संपादक झाले होते त्यांनी १९१२ मध्ये अल हिलाल नावाचे पेपर सुरु केला आणि त्यांनी हिंदु-मुस्लिम ऐकतेवर लिहायला बोलायला सुरुवात केली त्यामुळे मौलाना इंग्रजांना अडचणीचे होऊ लागले म्हणून इंग्रजांनी पेपरवर बंदी आणली .
तरी मौलाना थांबले नाही गप्प बसले नाही त्यांनी पुन्हा अल बलाग नावाने दुसऱ्या पेपरची सुरुवात केली ते भाईचारा ऐकता सर्वात महत्त्वाचे मानत होते आणि त्यावेळी राष्ट्रवाद,राष्टद्रोह जुम्लेबाजी झाली होते तेव्हा मौलाना आजाद राष्ट्रवाद घेऊन प्रखड विचार मांडत होते त्यावेळी देशाचे तुकडे होत होते तेव्हा हिंदु-मुस्लिम ऐकतेच्या घोषणा देणारे अग्रही नेते म्हणून मौलाना आजाद होते १९४७ मध्ये दिल्ली येथे जामा मज्जीदवर त्यांचे भाषण झाले आणि जे पाकिस्तानला जाणारे मुस्लिम होते ते त्यांच्या भाषणामुळे भारतात थांबले १९२१ मध्ये आग्राच्या अल हिलाल पेपरमध्ये मौलाना आजाद यांनी लिहिले की मी माझ पहिल लक्ष हिंदु मुस्लिम ऐकतेवर ठेवले आहे कि मी मनापासून सांगतो त्यांचे कर्तव्य आहे की ते हिंदुबांधवा सोबत प्रेमाचे भाईचाराचे संबंध ठेवावे ज्यामुळे आपण यशस्वी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
नेहरु महत्मा गांधी त्यांच्या विचाराने फार प्रेरित होते नेहरूंनी डिसकव्हरी आँफ इंडिया मध्ये लिहिले की भारतामध्ये राष्ट्रवादाच्या संदर्भात बोलताना मौलाना आजाद सारख्या लोकांना वाचणे विचार ऐकने फार गरजेचे आहे १८ मे१९४० मध्ये सेवाग्राम मध्ये मौलाना आजाद संदर्भात महात्मा गांधींनी लिहिले की इस्लामची माहिती जेवढी त्यांना आहे कदाचित कोणाला असू शकेल त्यांची जेवढी भक्ती इस्लामवर आहे तेवढी भक्ती राष्ट्रवादी मध्ये आहे जमा मज्जीतच्या भाषणातून मौलाना आजादांनी हाजारो मुसलमांना त्यांनी सांगितले "आओ कसम खालो ये मुल्क हामारा है हम इसकेलिऐ है और उसके तकदीर के बुनयादी फैसले हमारे आवाज के बैगेर आदुरे रहेंगे" असे प्रखड देशावर प्रेम करणारे मौलाना आजाद हे खर असलतरी देशाने धर्मनिरपेक्ष देशामध्ये पाच शिक्षणमंत्र्यांपैकी चार शिक्षणमंत्री मुस्लिम होते मात्र मुस्लिम समाजाची काय स्थिती आहे मौलानांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षणाची पायाभरणी आधुनिकता धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यावर केली विविध आयोग योजना शिक्षण संस्था अकादमी स्थापन केल्या याचा विसर पडला आहे या सर्व विचारांचा आभ्यास केला तर प्रचंड योगदान भारतीय मुस्लिम लोकांचे या देशासाठी आहे परंतु मुस्लिमांना दुय्यम स्थान देत त्यांना मुख्य प्रवाहात आणल जात नाही
अल्पसंख्याकांची प्री-मँट्रिक शिष्यवृत्ती रद्द केली संशोधनासाठीची अधिछात्रवृत्ती केंद्र सरकारने बंद केली,पाच टक्के शैक्षणिक मुस्लिम आरक्षणवर काही हालचाल नाही आणि मौलाना आजाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवत नाही आणि राजकारण ओट बँक यामुळे मुस्लिम समाजाकडे र्दुलक्ष जानिपुर्वक होत आहे यावेळी महिला प्रदेश कार्यध्यक्षा सिंधुताई तुळवे, चाँदभाई बलबट्टी, पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे,सौ.आफरीन पठाण, आसलम पठारे,युसुफभाई बागवान, रफिकभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते