प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पुणे : गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील प्रकरणात नवनवे खुलासे आता समोर येत आहेत. ललित पाटील ससून ऐवजी आपल्या सोसायटीत येऊन मुक्कम करायचा, पुणे कॅम्प भागातील एका सोसायटीतील रहिवाशांनी असा दावा केल्यानं जोरदार खळबळ उडाली आहे.
पुणे कॅम्प भागातील सेंट्रल पार्क सोसायटीतील एक व्हिडीओ फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये ललित पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे हे दोन्ही आरोपी सेंट्रल पार्क सोसायटीत निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत करणाऱ्या रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहानचे सेंट्रल पार्क सोसायटीत दोन फ्लॅट आहेत. बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून विनय अरहाना येरवडा कारागृहात होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ससुनमधील वॉर्ड नंबर 16 मधे हलविण्यात आले. याठिकाणी त्याची ओळख ललित पाटीलसोबत झाली. या ओळखीतून ललित पाटील ससुनमधून निघून अरहानाच्या फ्लॅटवर मुक्कामाला जात होता, अशी माहिती समोर येत आहे.
विनय अरहानाच्या सेंट्रल पार्क सोसायटीतील दोन फ्लॅटसाठी सेपरेट एंट्रन्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे ललित पाटील या बिनादिक्कत प्रवेश करत होता. इथूनच तो त्याचे ड्रग रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. पण आपल्या सोसायटीत इतका गंभीर प्रकार सुरु आहे, याचा या सोसायटीतील रहिवाश्यांना थांगपत्ताही नव्हता, पण आता रहिवाश्याने दावा केला आहे की, ललित पाटील ससून ऐवजी आपल्या सोसायटीत येऊन मुक्काम करायचा, त्यामुळे आता ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण आहे.
आमदार रवींद्र धंगेकरांचे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन,
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या महेंद्र शवतेला पुणे पोलिसांनी मंगळवारी (28 नोव्हेंबर) अटक केल्यानंतर आता येरवडा कारागृहातील कॉन्स्टेबल मोईन शेख आणि कौन्सिलर म्हणून काम करणाऱ्या सुधाकर इंगलेला अटक करण्यात आली आहे. यानंतर महेंद्र शेवते हा ललित पाटील आणि ससूनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील दुवा म्हणून काम करत होता, असा आरोप करत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केलं.