फराळ खरेदीसाठी नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद
सनी'ज् फूड्स आणि सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने सनी'ज् फूड्स आणि सोमेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात माफक दरात फराळ विक्री करण्यात येत आहे. स्पेशल चिवडा, शंकरपाळी, चकली, बेसन लाडू, शेव इत्यादी पदार्थ एकूण १४ ठिकाणी व्रिक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. खरेदीसाठी नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत असून जागोजागी फरळ खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या ''व्होकल फॉर लोकल'' च्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
या उपक्रमाचे उदघाटन मंगळवार (ता.७) शिवाजीनगर गावठाण येथे शेखर बहिरट ज्येष्ठ नागरिक, मॉडेल कॉलनी गणेश बगाडे अध्यक्ष भाजप शिवाजीनगर मतदारसंघ, रविंद्र साळेगावकर माजी अध्यक्ष शिवाजीनगर भाजप, अपूर्व खाडे अध्यक्ष भाजप युवा मोर्चा शिवाजीनगर, कस्तुरबा इंदिरा वसाहत भाजपा सरचिटणीस सचिन वाडेकर, औंध ज्येष्ठ नागरिक संघ, वडारवाडी मुकेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र पवार, सोमेश्वरवाडी ग्रामस्थ, बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघ, शिरोळे वस्ती १२०२ दत्त मंदीर महिला भजनी मंडळ, खडकी बाजार दुर्योधन भापकर उपाध्यक्ष खडकी बाजार कँन्टोमेंट बोर्ड, पाषाण पोपटराव जाधव अध्यक्ष सोमेश्वर देवस्थान, गोखलेनगर ज्येष्ठ नागरिक शामराव ताथवडेकर, राधा पांगारे अशा विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बुधवार (ता.८) सायंकाळी सात वाजेपर्यंत फराळाचे वाटप सुरू असणार आहे.
प्रतिक्रिया ...
'' नोकरदार वर्ग कामात व्यस्त असल्याने हवा तेवढा वेळ घरात देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती असली तरी हे सत्य आहे. मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रू समाजापर्यंत सर्वत्र ही परिस्थिती आहे. पण परिस्थिती व कामाच्या व्यापामुळे हे शक्य होत नाही, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच ही गरज ओळखून आम्ही सनी'ज् फूड्स व सोमेश्वर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने माफक दरात दिवाळी फराळ केंद्र सुरू केली. यातून समाजाची गरज भागवण्यासोबत घरगुती व केटरिंगची कामे करणाऱ्या महिला भगिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या!