नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा भव्य सत्कार

"इंडिया आघाडीचे पनवेल मध्ये शक्तीप्रदर्शन!"


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल :    पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी स्पष्ट झाला. विकासाच्या नावाखाली लढवलेली निवडणूक इंडिया आघाडी आणि भाजप महायुती ने प्रतिष्ठेची केली होती. पनवेल , उरण आणि खालापूर तालुक्याचे एकंदरीत चित्र पाहता मतदारांचा कौल इंडिया आघाडीकडे असल्याचे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले. ग्रामपंचायत क्षेत्रातील शहरी भागात काही ठिकाणी मतदानासाठी संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजप महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याविरुद्ध माजी आमदार बाळाराम पाटील यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व सांभाळले होते.

      सन्मान विकासाच्या  शिलेदारांचा , बहुमान इंडिया आघाडीचा! ही घोषणा घेऊन आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून 9 नोव्हेंबर 2023 नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा जाहीर सत्कार आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके पनवेल येथे सायंकाळी करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य आणि सरपंच यांच्या सोबत ग्रामीण भागातील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवडणूक हरलेल्या सर्व उमेदवारांचा सुद्धा त्यांना भविष्यातील नव्या उमेदीने काम करण्यासाठी शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित सदस्य आणि सरपंचांचा सन्मान करत असतानाच नागरिकांनी ज्या गोष्टीसाठी त्यांना निवडून दिले आहे ते काम नियमात बसवून कसे पूर्ण करावे यासाठी आपल्याकडे 24×7 माहिती उपलब्ध असावी यासाठी शेकाप नेते श्री.प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आज  सन्मानपत्र दिले गेले. त्यामध्ये एक स्कॅनर कोड आहे त्यात ग्रामपंचायत मध्ये काम करताना शासनाने ठरवून दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या होत्या ज्या भविष्यात काम करताना सदस्यांना उपयोगी येतील. 

      पनवेल आणि उरण मधील इंडिया आघाडी जेव्हापासून एकोप्याने काम करत आहे तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत आम्हाला यश प्राप्त झाले आहे . मग ती पनवेल अर्बन बँक , कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक किंवा आत्ताच पार पडलेला ग्रामपंचायतच्या निवडणुका जनतेने आम्हालाच कौल दिला असे शिवसेना नेते श्री बबनदादा पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मा.आमदार श्री बाळाराम पाटील, काँग्रेस नेते आर.सी. घरत, श्री सुदाम पाटील, शिवसेना नेते श्री बबनदादा पाटील, कृ.उ.बा.स. सभापती श्री नारायण शेठ घरत, उरण पंचायत समिती सभापती श्री नरेश घरत मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे , राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस श्री गणेश कडू, तालुका चिटणीस श्री.राजेश केणी, शेकाप उरण चिटणीस श्री.विकास नाईक ,मा.नगरसेवक सतीश पाटील,  काँग्रेसच्या युवानेत्या श्रुती म्हात्रे, युवानेते श्री. हेमराज म्हात्रे , शेकाप नेते श्री.संतोष जंगम, पनवेल अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री.पालकर गुरुजी  व इतर इंडिया आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोट

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना नव्याने निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांना ग्रामसभा करीत असलेली कामे, ग्रामपंचायतची महत्त्वाची कामे, ग्रामसेवकाचे काम, ग्रामपंचायत ग्रामसुची अशा काही महत्त्वाच्या विषयांची सविस्तर माहिती त्यांना दिलेल्या सन्मानपत्रा मध्येच एका स्कॅनर कोड मध्ये संकलित करून दिली आहे. ज्याचा उपयोग त्यांना पाहिजे तेव्हा स्कॅनर स्कॅन करून समोरील अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देऊन त्यांच्याकडून सदस्य काम करून घेऊ शकतील. जेणेकरून गावाच्या विकासाला चालना मिळेल हा प्रामाणिक उद्देश आहे.

श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे 

मा.विरोधी पक्षनेता, 

खजिनदार,शेकाप रायगड.

Post a Comment

Previous Post Next Post