प्रेस मीडिया लाईव्ह :
एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी एका चाहत्याला जोरात चापट मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे , या व्हिडीओतील नाना पाटकेरांच्या या कृत्याने नेटकरी संतप्त झाले असून त्यांनी नाना पाटेकरांवर जोरदार टीका करत आहेत . या ा संपूर्ण घटनेनंतर नाना पाटेकर यांनी चाहत्यांची हात जोडून माफी मागितली आहे . यासंदर्भातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाना पाटेकर सध्या 'जर्नी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. वाराणसी येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. याचदरम्यान, दशाश्वमेध घाटाजवळ शूटिंग सुरू असताना नाना पाटेकरांना पाहून एक चाहता त्यांच्याजवळ येऊन सेल्फी काढू लागला तेव्हा नाना पाटेकर यांनी संतप्त होत त्या चाहत्यांच्या डोक्यात जोरात चापट मारली आणि त्याला तिथून पळवून लावले. नाना पाटेकर यांचे हे कृत्य त्याच्या चाहत्यांसह नेटिझन्सला खूपच खटकले. या घटनेनंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आणि चाहत्याची माफी मागितली.
नाना पाटेकर यांनी ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत गैरसमजातून हे कृत्य झालं असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, 'एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मी एका मुलाला मारले आहे. हा आमच्या चित्रपटाच्या सीक्वेन्सचा भाग होता. आम्ही रिहर्सल केली होती. मागून एक माणूस येतो आणि म्हणतो, म्हातारा! टोपी विकायची आहे का' तो मुलगा येतो मी त्याला पकडतो, मारतो आणि त्याला वाईट वागू नकोस, सभ्यपणे वागायला सांगतो... आणि तो तिथून पळून जातो. आम्ही एक रिहर्सल केली होती आणि दिग्दर्शक म्हणाले की आपण ती पुन्हा एकदा करू.'
नाना पुढे म्हणाले, 'आम्ही रिहर्सल सुरू करणार होतो तेवढ्यात हा मुलगा तिथून आतमध्ये आला. मला माहिती नव्हते की तो कोण आहे. मला वाटते तो आमचाच माणूस आहे. मी सीनप्रमाणे त्याला मारलं आणि गैरवर्तन करू नकोस असे सांगितले… नंतर आम्हाला कळले की तो आमचा माणूस नाही. आम्ही त्याला बोलावायला गेलो पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने ते शूट केले असेल. मी कधीच कोणालाही फोटो काढण्यास नाही नाही म्हणालो. घाटावर खूप गर्दी असते आणि हे शूटिंग बाजारात सुरू होते. आता हे चुकून घडले. '
तसंच, 'तो आपलाच माणूस आहे या विचाराने मी हे केले. काही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा. मी अशाप्रकारे कोणालाही मारत नाही