प्रेस मीडिया लाईव्ह :
कुरुंदवाड : सर्फराज जमादार
कुरूदवाड --टाकळीवाडी येथील स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक ऊस तोड देणार नाही कारखानदार बगलबच्चाने केलेला कालचा ठराव हा आम्हास मान्य नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे मागील हंगामाचे चारशे रुपये व पुढील हंगामाचे पस्तीसशे. रुपये मिळाल्या शिवाय टाकळी वाडीतील ऊसाला कोयताही लावून दिला जाणार नाही असा निर्णय ग्रामपंचायत चौकामध्ये झालेल्या स्वाभिमानी कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला .
शुक्रवारी संध्याकाळी गावातील काही नेत्यांनी चौकात सभा घेऊन आम्हाला दर परवडतो दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊस वाळत आहे. त्यामुळे आम्ही तोड घेणार आहोत असा ठराव केला होता. त्याला आज स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करत ग्रामपंचायत चौकात जोरदार घोषणाबाजी केली तोड घेणाऱ्या कारखानदार समर्थकांचा निषेध करत तोड घेतल्यास त्याला कशाचे तसे उत्तर देण्याची भाषा करून कोणीही ऊस उत्पादकांनी तोड घेऊ. नये असे आवाहन केले.
यावेळी देवाप्पा आवटी ,अशोक पाटील, सुभाष शेंडगे गुंडाप्पा काने, संजय गोरवाडे, दिनकर पाटील, कल्लाप्पा चीगरे, तुकाराम भमाने, सुरज चिगरे ,बापू निर्मळे बबन वनकुरे, प्रकाश गोरवाडे, संजय बदामे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.