झिका आजाराच्या पार्श्वभूमीवर 15,668 नागरीकांचे सर्व्हेक्षण

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

संभाजी चौगुले : 

कोल्हापूर  : झिका आजाराच्या पार्श्वभुमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणामध्ये 15,668 नागरीकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यावेळी शहरामध्ये 4325 घरांचे सर्व्हेक्षण करुन 12,360 कंटेनरची तपासणी करण्यात आली. यामध्ये 129 दुषित कंटेनर आढळून आले. यावेळी 476 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली असून सर्वेक्षण दरम्यान 10 तापाचे रुग्ण आढळले आहेत. आज अखेर 457 नागरीकांचे रक्ताचे नमूणे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये 5 रुग्ण झिका पॉझिटिव्ह आढळून आले असून उर्वरत रुग्ण निगेटीव्ह आलेले आहेत.

    



  या आजाराची सुरवातीची लक्षणे म्हणजे ताप येणे, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी इत्यादी आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरात साचलेल्या निकामी, निरुपयोगी वस्तू नष्ट करुन परिसर स्वच्छ करावा, डबकी मुजवून ती वाहती करावीत, इमारतीवरील तसेच जमिनीखालील पाण्याच्या टाक्यांना डासोत्पत्ती होऊ नये याकरीता घट्ट झाकण बनवणे. खिडक्यांना तसेच व्हेंट पाईपला डास प्रतिबंधक जाळया बसवाव्यात, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावेत, एडीस डास दिवसा चावत असलेने दिवसा झोपताना देखील मच्छरदाणीचा वापर करावा. झिका आजारा संदर्भात गरोदर मातांनी डासांपासून संरक्षणासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी. या आजराबाबत नागरीकांनी घाबरुन न जाता उपाययोजना केल्यास धोका टाळता येतो. लक्षणे असलेल्या संशयित तापाच्या रुग्णांनी महापालिकेच्या नजिकच्या दवाखान्याशी अथवा रुग्णालयाशी त्वरीत संपर्क साधावा व सर्वेक्षणसाठी येणा-या आशा वर्कस यांना सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post