महानगरपालिकेत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

संभाजी चौगुले : 

कोल्हापूर ता. 26 :- संविधान दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. आपल्या भारत देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. या संविधान दिनानिमित्त  महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये आज अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

          या कार्यक्रमास  सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी शंकर यादव, उपशहर अभियंता नारायण भोसले, रमेश कांबळे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशम अधिकारी मनिष रणभिसे, आस्थापना अधिक्षक राम काटकर, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, विजय वणकुंद्रे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

          त्याचबरोबर महापालिकेच्या 57 शाळेतील विद्यार्थ्यांनी बिंदू चौक येथे भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन शहरातील प्रमुख मार्गावरुन संविधान गौरव महारॅली काढली. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, प्रशासन अधिकारी शंकर यादव, परिवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे व शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थ्यांथी मोठया संखेने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post