कोल्हापुर शहराचा बंद असलेला पाणी पुरवठाचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर .




प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन , जल अभियंता , ज्युनियर इंजिनियर्स , काँट्रॕक्टर कणसे आणी धोका पत्करून ५० फूट खाली अपूऱ्या चेंबर मधे काम करणारे १५ जाँबाज कामगार यांचे गेला ८-१० दिवसरात्रच्या  कष्टाला  अखेर यश आलेय..

महानगरपालिकेच्या बालिंगा पंपिंग स्टेशन मधील ५०' खाली असलेल्या "फिडर चॕनेल" मधील चेंबर २०१९ साली कोसळून पाणीपुरवठा हळूहळू कमी होत गेला.. इंजिनियर्स ना त्यावेळ पासून हे माहीत होते..पण या पंपिंग स्टेशन वरून येणारे पाण्यावर जवळजवळ निम्मे शहर अवलंबून होते.. दुरूस्ती साठी हात घालायचा तर १०-१५ दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागणार होता.. अशावेळी alternate व्यवस्था नसलेमुळे शहराचे पाणी इतके दिवस तोडणेचे धाडस कुणी करत नव्हते.. पण अलिकडे परिस्थिती अजूनच बिकट झाली .मग जल अभियंता नेत्रदिप सरनोबत नी उद्भवणाऱ्या प्रचंड रोषाचे परिस्थिती ला सामोरे जात हे काम करणेचे नियोजन केले...  सर्व स्टाफ सह धाडसी व असल्या कामात निपूण असलेल्या कामगारांसह नियोजनबद्ध व सुरक्षेची पूर्ण काळजी घेवून  दिवसरात्र सलग काम सुरू झाले.. पण अंदाजापेक्षा जास्त अडचणी पुढे आले मुळे कामाला विलंब होऊ लागला शहरातील नागरिकांनी पण समजूतदारपणा दाखवला पण काही उत्साही नेते लोकांचा संयम सुटला फोनवरून शिव्या घालणे , अधिकाऱ्यांच्या दारात  उभा राहून अंघोळ करणे असले प्रकार सुरू झाले.. ज्यांनी प्रत्यक्ष कामाची व्याप्ती पाहिली ते सहकार्याला पूढे आले..

आज चेंबरमधे पाईप टाकून चेंबर बांधून काँक्रिटीकरण पूर्ण झालेय..एक पंप सुरू झालाय..अजूनही आतील उर्वरीत दगड गाळ काढणे सुरू आहे.. संध्याकाळपर्यंत दुसरा पंप सुरू होईल.. काँक्रिट सेट होताच फिडर च्या प्लेटस् काढून पूर्ण क्षमतेने जॕकवेल भरली जाईल,. उद्या पासून पाणीपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास साईटवरील अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्त केलाय...

आता ६०-७० वर्षे जुन्याच यंत्रणेवर काम न चालवता अध्यावत यंत्रणेसह अशा "सर्व्हिसेस" ना additional / parallel व्यवस्था असायला हवी हे गेल्या काही दिवसांत दिसून आले...

साईटवर ठाण्याचे श्री. जोसेफ वर्गिस हे आले होते. ते याच जॕकवेलला जोडणारे  दुसरे चॕनेल  पाईप टाकून तयार करणार आहेत.. त्यात horizontal boaring ने ( trenchless technology वापरून ) ...

अत्यंत धाडसाने , काळजीपूर्वक व एकाग्रतेने अहोरात्र काम करून  पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करणेस  राबलेल्या सर्वांचे अभिनंदन ...!!

Post a Comment

Previous Post Next Post