प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील पाचगाव येथे रहाणारा संतोष बाळासो गाडगीळ (वय 35.रा.पाचगाव) या युवकाने स्वतःच आपले हात-पाय बांधुन घेऊन बालिंगा येथील भोगावती नदीत उडी मारून आत्महत्या केली.या घटनेचा नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.संतोष हा आपल्या पत्नीस दवाखान्यात घरी आल्यानंतर दुपारी आपली दुचाकी घेऊन बाहेर पडला होता.तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह बालिंगा पुलाजवळ मिळून आला.
आपत्ती व्यवस्थापन च्या जवानानी रेस्कु करून त्याचा मृतदेह बाहेर काढ़ण्यात येऊन त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.पुढ़ील तपास करवीर पोलिस करीत आहेत.