प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- शिरोली राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी चक्का जाम आंदोलनास सुरु केले होते.पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक अगोदरच अन्य मार्गाने वळविली असल्याने या मार्गावरील वहातुक तुरळक प्रमाणात चालू होती.या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग दिसून येत होता त्या मानाने बंदोबस्तास असणारे पोलिस प्रशासन त्या परिसरात तळ ठोकून होते.
या संघटनेच्या काही कार्यकार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतल्याचे समजताच काही काळ तणाव निर्माण झाला होता.शिरोली फाट्यावर संघटनेचे नेते मा.खा.राजू शेट्टी येताच आंदोलनकर्त्यानी त्याचे जोरदार स्वागत केले.या आंदोलनाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भेट देऊन मा.खा.राजू शेट्टी यांची भेट घेऊन पाठिंबा देऊन योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.शेतकरयांनी घरातुन भाकरी आणली होती.तर आंदोलनकर्त्यानी महामार्गावर भात आमटी शिजवून तेथेच पंगती पडल्या .
या पंगतीत मा.खा.राजू शेट्टीही सामील झाले होते.सायंकाळी सात वाजे प्रर्यत आंदोलनकर्ते जागचे हलले नाहीत शेवटी कारखानदार आणि संघटनेची जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक होऊन तोडगा निघाल्याने मा.खा.राजू शेट्टी यांनी हे आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.पण कारखानदारांनी जिल्हाधिकारी यांना तसे पत्र दिल्या शिवाय ऊसाची तोड आणि कारखाना सुरू होणार नाही अशी भूमिका मा.खा.राजू शेट्टी यांनी घेतली.