प्रेस मीडिया लाईव्ह:
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-कंळबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी बनविलेल्या वस्तु विक्रीचा शुभारंभ कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफसो ,यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आपल्या मनोगतात मुश्रीफ यांनी कारागृहात सापडलेल्या वस्तूच्या मुळे कारागृहातील पोलिसांची प्रतिमा मलीन झाली असल्याने येथुन पुढे आपले कर्तव्य प्रामाणिक पणे काम करून बदलावी लागेल .महाराष्ट्रातील कारागृहातील कैदी यांनी तयार केलेल्या वस्तुना बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले.
कंळबा कारागृहात भरविण्यात आलेल्या वस्तुचे विक्री प्रदर्शन 19 नोव्हेंबर 2023प्रर्यत स.9 ते सा.9 या वेळेत सर्वासाठी खुले असून याचा लाभ घेण्याचा कारागृहाच्या वतीने आव्हान केले आहे.या वेळी कारागृह अधिक्षक पांडुरंग भुसारे यांच्यासह कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.