झालेल्या वादातुन मित्रानीच केला मित्राचा खून.




प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- संभाजीनगर येथे असलेल्या निर्माण चौक परिसरात   रात्रीच्या वेळी तिघे मित्र बोलत बसले होते.या वेळी त्यांच्यात वाद होऊन एकाचा डोक्यात दगड घालुन खून करण्यात आला.खून झालेल्या तरुणाचे नाव शुभम अशोक पाटील (वय 28 रा.रामानंदनगर ).असे त्याचे नाव आहे.या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयीत बंडा मोरे आणि संग्राम पाडळकर या दोघांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




याची फिर्याद मयत शुभमचे वडील अशोक पाटील यांनी दिली आहे.अधिक माहिती अशी की,या परिसरात असलेल्या पाडळकर कॉलनीतील बंडा मोरे ,संग्राम पाडळकर आणि शुभम पाटील हे एकमेकाचे मित्र आहेत.हे त्या रात्री संभाजीनगर येथील मैल खड्डा परिसरात बसलेले असताना त्यांच्यात बोलता बोलता वाद निर्माण होऊन रागाच्या भरात मोरे आणि पाडळकर यांनी शुभम ला मारत मारत खाली पाडले आणि शेजारी पडलेला दगड उचलून शुभमच्या डोक्यात घालून त्याचा चेंदामेंदा केला.

त्याचा खून झाल्यावर तेथून पसार झाले.हा प्रकार तेथुन जाणा येणारयां  लोकांनी पहाताच या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना  फोन करून दिली असता पोलिस घटना स्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला.या खूनाचे नेमकेच कारण समजू शकले नाही.या प्रकरणी अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मोरे आणि पाडळकर यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झालेल्या वादातुन मित्रानीच केलेल्या मित्राचा खून केल्या प्रकरणी दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी.

Post a Comment

Previous Post Next Post