प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - कृषी व्यवसायाचा परवाना देण्यासाठी नऊ हजाराची लाच घेताना जिल्हा कृषी अधिकारी सुनिल जगन्नाथ जाधव (वय 50 रा.जाधववाडी ,कोल्हापुर).यांना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली.तक्रारदार हे शेतकरयांना सेंद्रिय शेती आणि जैविक शेती करण्यासाठी सल्ला देत असतात.त्या साठी लागणारी बि-बियाणे ,किटकनाशके आणि खते याची विक्री करण्यासाठी त्यांच्या दुकाणाला परवान्याची गरज होती.त्या करीता यांनी जिल्हा कृषी विभागाकडे ऑन लाईन पध्दतीने अर्ज केला होता.तो अर्ज मंजूर करून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी कृषी अधिकारी जाधव यांनी तक्रारदाकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली .
त्यात तडजोड करून नऊ हजार रुपये द्यायचे ठरवले.दरम्यान तक्रारदाराने या अधिकारी जाधव यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.या विभागाने याची खात्री करून सापळा रचून तक्रारदारा कडुन नऊ हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई करुन त्याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला ,पोलिस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.