प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-कोल्हापुर महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्र.3 मधील घरफाळा विभागातील क्लार्कनां साडेतीन हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली.शेखर अरुण पाटील (वय 26)आणि रोहित विनायक जाधव (वय 32 .दोघेही रा.मंगळवार पेठ,कोल्हापुर).अशी कारवाई झालेल्या दोघां क्लार्कची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,तक्रारदार याने मिळकत खरेदी केली होती .घरफाळा विभागाकडे नाव नोंद करण्यासाठी अर्ज केला होता.या अर्जानुसार घरफाळ्याला नाव लावणे साठी वरील दोघां क्लार्कनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती यात तडजोड करत साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले.दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची लाचलुचपतच्या पथकानी पडताळणी करून आज राजारामपुरी येथील घरफाळा विभागात सापळा रचून क्लार्कला साडेतीन हजाराची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
घरफाळा विभागातील दोघांजणावर लाचेची कारवाई झाल्याची समजताच कोल्हापूर महानगरपालिका कडील काही संघटनेचे पदाधिरी यांनी लाचलुचपत कार्यालयाच्या आवारात एकच गर्दी केली होती.ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक मा.सरदार नाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.